ब्रेकिंगमहाराष्ट्र
दिवा शहरात जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर शिक्षकांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल… तसेच गैर इत्तर शिक्षकांवर देखील टांगती तलवार, दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त…
अमित जाधव - संपादक

0
2
5
9
9
3
दिवा शहरात जनगणनेच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर शिक्षकांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…तसेच गैर इत्तर शिक्षकांवर देखील टांगती तलवार, दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त…

ठाणे -दिवा शहरात जनगणनेच्या कामासाठी (Census Duty) नियुक्त करण्यात आलेल्या अनेक शाळांमधील शिक्षक प्रशिक्षणाला गैरहजर राहत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, ज्याची दखल प्रशासनाने घेतली असून ठाणे महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त तथा चार्ज अधिकारी यांनी ड्यू ड्रॉप स्कूल ग्लोबल इंग्लिश स्कूल,साउथ इंडियन स्कूल यां शाळेतील शासकीय शिक्षकप्रशिक्षणास गैरहजर जनगणना राष्ट्रीय कर्तव्य कर्तव्यात कसूर करत मुंब्रा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे तसेच संबंधित शिक्षण विभागात देखील योग्य रीतीने शिक्षकांवर पुढील कारवाई साठी देण्यात येणार आहेत.असे दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी कळविले आहे
तसेच इतर अनेक शाळांमधील शिक्षक देखील प्रशिक्षणासाठी गैरहजर राहत आहेत त्यासंबंधी देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे ही ठिकाणी परीक्षा आणि शैक्षणिक कामकाजामुळे शिक्षक प्रशिक्षणाला उपस्थित राहू शकत नाहीत, असे कारण दिले जात आहे.यांचा परिणाम अनेक शिक्षक गैरहजर राहिल्याने घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याच्या (House-listing) प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता आहे
0
2
5
9
9
3



