Breaking
ब्रेकिंग

विश्ववंदनीय डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जनविकास फाऊंडेशनच्यावतीने मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया व डोळे चेकअप.!..!

0 2 0 9 7 4

विश्ववंदनीय डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जनविकास फाऊंडेशनच्यावतीने 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी १० ते दुपारी २.०० या वेळेत शहरातील वक्रतुंड नगर,ग्लोबल शाळेजवळ,आगासन रोड दिवा पुर्व येथे मोफत मोतीबिंदू आँपरेशन आणि मेडिकल चेकअप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबीराचे शहरातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जन विकास फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री अशोक सोलंकी यांनी केले आहे.

स्वस्त दिवा,मोतीबिंदू मुक्त दिवा असे ब्रीद वाक्य घेवून सामाजिक क्षेत्राची आवड असलेले शहरातील प्रतिष्ठीत नागरिक श्री अशोक सोलंकी यांनी हे शिबीर आयोजित केले आहे.या शिबीरात मोतीबिंदू आँपरेशन,मेडिकल चेकअप मोफत केले जाणार आहे.शिवाय जनरल विकनेस,डायबीटीस,ब्लड प्रेशर,अस्थमा,किडनी स्टोन,थायराँईड,स्कीन,साईनस,पॅरालिसीस,लिव्हर,मेमरी,वेट गेन,कोलेस्टोरोल,हेअर लोस,बोन हेल्थ,इम्युनिटी युझर,हार्मोनेल,असिडीटी,हार्ट हेल्थ,स्टमक,ब्लड फ्लोटींग आदी विविध आजारांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.या शिबीरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी सोबत आधार कार्ड आणि पॅनकार्डची छायांकित प्रत सोबत आणने गरजेची आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे