Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते निलेश पाटील यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते निलेश पाटील यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन*

दिव्याच्या रस्तेकामाबाबत विरोधकांना चपराक….

ठाणे / दिवा ता 27 मार्च ( संतोष पडवळ) – दिव्यात गेल्या महिन्यात भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या निलेश पाटील आणि अर्चना पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

दिव्यात आपला दवाखानाचे चार शाखाचे उद्घाटन झाल्यानंतर दिवा पूर्वेतील साबे गावात खासदार श्रीकांत शिंदे यांचे फेटा बांधून तुतरीच्या जल्लोषात निलेश पाटील यांनी स्वागत केले. त्यावेळी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून दिव्यात होणाऱ्या विकासकामांचा आढावा शिंदेंनी आपल्या मनोगतातून सर्वसामान्यांना सांगितला. दिव्यातील दिवा आगासन रोड असो वा दिवा साबे रोड असो हे 90 टक्के काम पूर्ण झाले असून दिव्यातील चाळींमधील पायवाटांचेही क्राँक्रेटी करण झालेले आहे. तसेच शिळफाटा ते दिवा व मानपाडा ते दिवा अश्या दिव्याला मिळणाऱ्या रस्त्याचे देखील टेंडर काढून लवकरच काम सुरु होईल असे त्यांनी प्रतिपादन केले तसेच अजूनही आपला दवाखाना च्या आणी चार शाखा सुरु होणार आहे हे सांगितले. तर 5 कोटींचा निधीही दिव्याच्या आरोग्य केंद्रासाठी ठाणे महापालिके कडून मंजूर करण्यात आला आहे असे ही शिंदे यांनी मनोगतात सांगितले.प्रसंगी शिवसेनेचे गोपाळ लांडगे तसेच सर्व माजी नगरसेवक, सर्व शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते व शेकडो समर्थक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे