Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अखेर दिवा पश्चिमेस लवकरच पाणीपुरवठा सुरळीत ,आज रेल्वे अधिकाऱ्यांसोबत शिवसेनापदाधिकारी यांनी जागेची केली पाहणी……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे (प्रतिनिधी) दिव्यातील पाणीप्रश्न जाणवत असतानाच आज मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक श्री शलभ गोयल यांनी दिव्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समवेत दिवा पश्चिम येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाईपलाईनचे (पुश थ्रु) काम जलदगतीने होण्यासाठी जागेची पाहणी केली असून या कामाचा लवकरच शुभारंभ करणार असल्याचे सांगितले आहे.

दिवा पश्चिमेला लोकसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.त्यामुळे येथील लोकांनाही पाण्याची समस्या जाणवत आहे. या समस्येचे कायमस्वरुपी निराकरण करण्यासाठी आज शिवसेना खासदार डाँ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दिव्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी  रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांच्यासमवेत जागेची पाहणी केली.यावेळी ठाणे महानगरपालिचे अधिकारी,शिवसेना मा.नगरसेवक श्री शैलेश पाटील,मा.नगरसेवक श्री अमर पाटील,रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अँड.श्री आदेश भगत,शिवसेना विभागप्रमुख श्री भालचंद्र भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे आश्वासन

गावदेवी मंदीर ते एन.आर.नगर येथील स्टेशनलगतचा रस्ता ,दिवा पश्चिमेला होम प्लँटमार्फ,दिवा तिकीट आँफीस समोर पत्री शेड,दिवा पुर्वेला उतरण्यासाठी असणाऱ्या अरुंद जिन्याच्या बाजूला आणखी नवीन रुंद जिना उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री शलभ गोयल यांनी आश्वासन दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे