0
2
0
9
7
4
दोन सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ अनेक लोकल एकापाठोपाठ उभ्या आहेत. तसेच यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम सुरु आहे. गेल्या एक तासापासून रेल्वेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सिग्नल यंत्रणा दुरुस्त होताच लोकल वाहतूक सुरळीत होईल.
0
2
0
9
7
4



