Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवा शहरातील तलाव अस्वछ, नागरिकांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणावर त्रास..  दिवेकरांच्या आरोग्यावर परिणाम, सचिन भोईर आक्रमक..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

अमित जाधव
 दिवा शहरातील स्टेशन परिसरात असलेला तलाव सध्या अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आहे. सदर तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा, प्लास्टिक, सांडपाणी तसेच जलकुंभ (हायसिंथ) साचलेले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
तलावाची ही अवस्था आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक असून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
 सदर तलावाची तातडीने स्वच्छता करून कचरा व जलकुंभ काढण्यात यावा, तसेच भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती नियमित देखभाल व्यवस्था करण्यात यावी या गंभीर विषयाची तातडीने दखल घ्याल, अशी अपेक्षा आहे.असे सचिन भोईर यांनी नाराजी व्यक्त करत आपल निवेदन पालिका प्रशासनास दिले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे