प्रजाकस्ता दिनी लोकशाही वर भाषण केलेला चिरमुडा सोशल मीडियावर खूप वायरल झाला, त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट व या आजाराने त्रस्त…
अमित जाधव - संपादक

‘या लोकशाहीमध्ये तुम्ही भांडू शकता, दोस्ती करू शकता, प्रेमाने राहू शकता पण मला तर मोक्कार धिंगाणा करायला, खोड्या करायला, रानात फिरायला, माकडासारखे झाडावर चढायला खूप आवडते…असे केल्यामुळे माझे बाबा मला मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात’….असे म्हणत एका चिमुरड्याने लोकशाहीची व्याख्या सांगणारे एक भाषण केले. आणि पाहता पाहता त्याचे हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाले. मात्र सगळ्यांच्या नजरेत भरणाऱ्या या चिमुरड्याची परिस्थिती मात्र खूपच हलाकीची असल्याचे समोर आले आहे. लोकशाहीवर भाषण करणाऱ्या या चिमुरड्याचे नाव आहे कार्तिक जालिंदर वजीर. कार्तिक हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली इयत्तेत शिकतो.
त्याला त्यांचे मित्र भूऱ्या नावाने हाक मारतात. कार्तिकला जन्मापासूनच रातांधळेपणा आहे. रात्रीचं त्याला काहीच दिसत नाही. आणि दिवसा सुद्धा दोन फुटापेक्षा जास्त अंतरावरच तो पाहू शकत नाही. कार्तिकला पुस्तक वाचायचं असेल तर त्याला ते पुस्तक तोंडाजवळ धरावे लागते. एवढेच नाही तर कार्तिकची त्वचा सुद्धा खूप नाजूक आहे. तो जास्त वेळ उन्हात राहू शकत नाही. उन्हात गेला की त्याची त्वचा लगेचच लाल होते. अशा या खडतर परिस्थितीत कार्तिक आपले शालेय शिक्षण घेत आहे. कार्तिकच्या या आजारावर उपचार व्हावेत अशी त्याच्या वडिलांची ईच्छा आहे. मात्र जवळ पैसे नसल्याने त्यांनी आजवर त्याला कुठल्याच दवाखान्यात नेले नाही. आर्थिक चनचनीमुळे ते त्याच्यावर उपचार करू शकत नाहीत. त्याच्या या अवस्थेपुढे ते हतबल आहेत. मात्र त्याच्या भाषणामुळे लोक कार्तिकचं सर्वत्र कौतुक करत आहेत. हे पाहून मीडिया माध्यमातून कार्तिकची एक मुलाखत घेण्यात आली त्यावेळी त्याच्या परीस्थिती बद्दल लोकांना माहिती मिळाली. कार्तिकच्या वडिलांनी आणि शाळेतल्या शिक्षकांनी देखील त्याच्यावरील उपचारासाठी लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सोशल मीडियावरून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.लोकशाहीची व्याख्या आपल्या भाषणाने अगदी सुटसुटीत समजावून सांगणाऱ्या या कार्तिक जनार्दन वजीरची आयुष्याची ही कथा मात्र मन हेलावून टाकणारी आहे. त्याच्या मदतीला आता अनेकांचे हात पुढे सरसावले आहेत. लोकांच्या मदतीने कार्तिकवर योग्य उपचार केले जातील अशी आशा आहे. या उपचारानंतर तो लोकशाहीची व्याख्या खऱ्या अर्थाने जगेल असा विश्वास सर्वांना आहे. खरंतर लहानग्या भूऱ्या सारखे अनेक मुले असे हलाकीचे जीवन जगात आहेत पण चेहऱ्यावर हास्य उमठवत समोरच्याला गरिबीची आणि परिस्तितीची जाणीव होऊ न देता इतरांना देखील ह्या लहानग्याने मनमुराद हसवलं आहे. लोकशाहीची व्याख्या आपल्या भाषणाने सांगणाऱ्या कार्तिक जालिंदर वजीर याला लोक मदत नक्की करतील पण अश्या इतर लहान मुलांसाठी शासनाकडून काहीतरी विशेष मदत नक्कीच मिळायला हवी जेणेकरून अश्या गरीब मुलांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या किमान डोळे तरी पाणावले जाणार नाहीत.



