मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचा सामजिक एकात्मतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा ; ना भेद, ना भाव, सर्व धर्म समभाव…….
अमित जाधव -संपादक
*मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचा सामजिक एकात्मतेचा संदेश देत गणेशोत्सव साजरा ; ना भेद, ना भाव, सर्व धर्म समभाव*
प्रतिनिधी : मानवी हक्क संरक्षण फेडरेशन मध्ये अनेक जाती धर्मातील तरुण एकत्र येत अनेक वर्षांपासून “ना भेद, ना भाव, सर्व धर्म समभाव’ या उक्तीप्रमाणे सर्व धर्माचे सण साजरे करतात. ईद, दिवाळी, मोहरम, गुरुनानक जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, आदी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गेल्या वर्षी पासून गणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तीभावाने करत या वर्षी ही दीड दिवसाच्या गणेशोत्सव संस्थेतील सर्व धर्माचे लोकांनी मिळून साजरा केला.
या बद्द्लची माहिती फेडरेशनचे संचालक डॉ.मुनीर तांबोळी यांनी दिली. या फेडरेशन मध्ये सर्व समाजाचे तरुण, तरुणी काम करत आहेत. या तरुणांनी जाती-पातीचा अडसर न मानता गणेशोत्सव काळात गणेशाची प्रतिष्ठापना करून मोठ्या भक्ती भावाने आणि मनोभावे हा गणेशोत्सव साजरा करत आहेत.
गणेशाची प्रतिष्ठापना ते गणेश विसर्जनापर्यंत दीड दिवस हे सर्वच तरुण गणेशाच्या सेवेत तल्लीन झाले आहेत.
यासाठी संचालक डॉ.मुनीर तांबोळी, संचालक श्रेयस ठाकूर, भूषण निकम,निलेश भगत, इद्रिस शेख, रेखा शर्मा, निखिल बरुआ, गुरदीप सिंह, पंकज शहा, कुमार नागपाल, सुनीता शर्मा, अजित निकम, ऑड्री मोरायस,कविता बिरु, रत्नमाला पाबरेकर,रत्नप्रभा गोमसे, नंदू पाटील, आदी यासाठी मेहनत घेत आहेत.
अनेक मान्यवरांनी येऊन गणरायाचे दर्शन घेतले. पोलीस अधिकारी,कर्मचारी,तारक मेहता का उलटा चष्मा जेष्ठ अभिनेते प्रकाश राणे, महावितरण चे डी.के.मोरे,मा. नगरसेविका नीता माळी, नीरज मोरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले, जेष्ठ समाजसेविका जयश्री सावर्डेकर,शेकाप वाहतूक अध्यक्ष प्रभुदास भोईर, व अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भक्ती भावाने गणारायाचे विसर्जन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा शाल, व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. निसर्ग पूरक साडूची माती ची मूर्ती आणि तुळशीचे रोप देऊन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने फेडरेशनने गणेशोत्सव साजरा केला. अनेकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.