मानव संरक्षण समिती ने कल्यान डोंबवीली महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त यांची घेतली भेट…
अमित जाधव-संपादक
मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री विजयजी कुराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगर पालिका नवनिर्वाचित आयुक्त सन्माननीय श्री डॉ. भाऊसाहेब दांगडे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटी दरम्यान आयुक्त साहेबांना पुष्प गुच्छ, शाल आणि मोमेंटो देऊन मानव विकास संरक्षण समिती तर्फे सत्कार करण्यात आला, व कल्याण, डोंबिवली शहराच्या समस्या, रस्त्यांची दुर्दशा आणि तुंबलेल्या गटारींसंबंधी समस्यां विषयी आयुक्त साहेबांशी चर्चा केली व तत्परता दाखवत आयुक्त नी सुद्धा त्याला सकारात्मकता दाखविली व लवकरच कल्याण डोंबवलीकरांसाठी इतर सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले यावेळी मानव विकास संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय श्री विजयजी कुराडे साहेब व त्यांच्या बरोबर कोअर कमिटी अध्यक्ष श्री रविदास बाविस्कर, श्री प्रवीण गायकवाड, श्री देवेंद्र देशमुख, श्री दुष्यंत डिंगणे, श्री शरद जाधव, श्री गुड्डू चौहान, सौ. सुनीता भारती, कु. निशांत लोखंडे, श्री महेश भोईर, श्री ललित पगारे व श्री चंद्रकांत शेलार आदी उपस्थित होते.