Breaking
महाराष्ट्र

नऊ दिवसांची नवरात्री….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

नऊ दिवसांची नवरात्री

आपल्या भारतीय संस्कृतीत आपण अनेक सण – उत्सव साजरे करत असतो. त्यातीलच एक उत्सव म्हणचे नवरात्री. नवरात्री या शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे तो अर्थ म्हणजे नऊ दिवसांची रात्र. या नऊ दिवसात दर दिवशी दुर्गा मातेच्या शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नऊ रुपांची पूजा उत्साहात केली जाते.  काही लोक नऊ दिवस उपवास पाळतात , तर काही लोक पायात चप्पल न घालता फिरतात. काहीजण नवव्या दिवशी नऊ मुलींची देवीचे रूप म्हणून मनोभावे पूजा करतात व प्रसाद म्हणून हलवा पूरी खाऊ घालतात.  या नऊ दिवसात आप- आपल्या कुलस्वामिनीचे दर्शन घेण्यासाठी भक्त दूर-दुरून  प्रवास करत देवीच्या चरणी माथा टेकतात.  काही ठिकाणी नवरात्री उत्सवात जत्रा भरवल्या जातात.  कीर्तन, भजनाचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात याचबरोबर देवीची मनोभावे पूजा करत लोक नऊ दिवस गरबा व दांडिया खेळतात.सगळीकडे मंगलमय वातावरण या दिवसात पाहायला मिळते. नऊ दिवस नऊ रंग ही परंपरा देखील या नऊ दिवसात पाहायला मिळते म्हणजे प्रत्येक दिवशी जो रंग असेल त्या रंगाचे कपडे पुरुष व महिला मंडळी परिधान करताना दिसतात.

गेली दीड ते दोन वर्षे  संपूर्ण राज्यातील मंदिरे कोरोना महामारीमुळे बंद होती.  नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आजपासून  सर्व मंदिरे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुली करण्यात आली आहेत.  मंदिराचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. श्रद्धेपोटी मंदिरे जरी चालू केली गेली असली तरी कोरोना अजून गेलेला नाही आहे याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे.  सरकारी नियमांचे पालन जर आपण केले तर नक्कीच एक दिवस आपण कोरोना मुक्त होऊ शकतो आणि आपले सण- उत्सव पूर्वीसारखे जल्लोषात साजरे करू शकतो.

जूनैद खान
सरस्वती बाग शाळा
सलाम बॉम्बे फाऊंडेशन , मीडिया अकादमी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे