Breaking
गुन्हेगारीमहाराष्ट्र

वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले ; पोलिस जागीच ठार…….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 9

वाळू माफियांच्या गाडीने पोलिसाला चिरडले ; पोलिस जागीच ठार

संतोष पडवळ-कार्यकारी संपादक

सोलापुर (मंगळवेढा:)वाळूची गाडी थांबवताना पोलीस कॉन्स्टेबल गणेश प्रभू सोनलकर यांना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना सकाळी ९:३० च्या सुमारास गोणेवाडी-शिरशी रोडवरील हॅट्सन डेयरी येथे घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मे.जिल्हा न्यायालयात लोकअदालत असल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी गेले होते.
गोणेवाडीचे पोलीस पाटील यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे वाट पाहत तिथे थांबले होते.

समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला हात केला असता वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घातला,
त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल सोनलकर हे गाडीखाली चिरडले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातील अधिकारी हॉस्पिटलमध्ये धावले,
दरम्यान या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे