दिव्यात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी.* आमदार राजेश मोरे, मा. आमदार सुभाष भोईर यांची उपस्थिती…
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता १५ फेब्रु : संत सेवालाल गोर बंजारा समिती दिवा शहर आयोजित २८७ वी जयंती दिवा शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसंगी संपूर्ण दिवा शहरात भव्य रॅली काढण्यात आली. दिवा चौकाजवळील मैदानात संत शिरोमणी सेवालाल महाराज व आई जगदंबा मरयम्मा माता यांची भोगविधी कार्यक्रम व महाप्रसाद तसेच शालेय विदयार्थी गुणगौरव सोहळा व नृत्यअविष्कार साजरा करण्यात आला. बंजारा समाजाचे अनेक प्रश्न व समस्याचे निराकरण करण्यासाठी सदैव पाठीशी राहू असे प्रतिपादन आमदार राजेश मोरे व मा.आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केले.
प्रसंगी सदर कार्यक्रमास शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक रमाकांत मढवी, नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव, स्नेहा अमर पाटील, दर्शना चरणदास म्हात्रे, अनिलशेठ भगत, कैलास भगत, भालचंद्र भगत, बालाजी कदम, चंदर राठोड, बाबू राठोड, वासू राठोड, देविदास राठोड, उमेश राठोड यांच्यासह संत सेवालाल गोरबंजारा समितीचे सर्व सभासद उपस्थित होते तर सदर समितीचे अध्यक्ष शंकर पवार, सचिव तारासिंग पवार. खजिनदार मिथुन आडे, विजय पवार, प्रविण राठोड, गुड्डू राठोड, शंकर राठोड, लक्ष्मण चव्हाण, रामेश्वर पवार, रमेश राठोड, यांनी आलेल्या उपस्थित मान्यवरांनाचे स्वागत व सत्कार केला.



