0
2
0
9
7
4
आज दिनांक २४/१०/२०२५ रोजी ०३:०७ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार *(घटनेची माहिती देणारे – मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्ष)* वैभव ढाबा जवळ, जीवदानी नगर, दिवा शीळ रोड, दिवा (पू.), ठाणे या ठिकाणी ०३ गाळ्यां मध्ये आग लागली होती. *सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- फायर वाहन व ०१ – रेस्क्यू वाहनासह तसेचटोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.* घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी लागलेली आग ०३:४५ वाजता पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
0
2
0
9
7
4



