दिव्यात तिथीनुसार तीसाई नगर येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरा…!
अमित जाधव - संपादक
ठाणे -दिवा शहर शिवसेना शाखा तिसाई नगर फाल्गुन कृष्ण ३ शके १९४५ गुरुवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या उपस्थितीमध्ये तिथी नुसार शिव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.त्याप्रमाणे दिनक्रम सकाळी ६ ते ८ प्रयत्न शिवज्योत आगमन स्वराज्य प्रतिष्ठान, शिवगर्जना मित्र मंडळ यांच्या सहभागाने किल्ले दुर्गाडी कल्याण ते शिवसेना शाखा तीसाई नगर , दतिवली आगमन होणार आहे सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल व शालेय विद्यार्थ्यांना वस्तू वाटप करण्यात येतील. सायंकाळीं ६ ते ७ दरम्यान श्री ओम साई प्रासादिक भजन मंडळ,रायगड भूषण भुवा संतोष कानु शितकर यांचे भजन , अभंग होऊन रात्री कुडाळ येथील साळगाव चे सुप्रसिध्द नाट्य मंडळाचे ओमकार दशावतार नाटक आयोजित करण्यात आले आहे असे आयोजक व शिवसेनेचे तीसाई शाखाप्रमुख निलेश रोहिदास म्हात्रे यांनी कळविले आहे.
उपशाखा प्रमुख , गट प्रमुख,महीला शाखा संघटक ,उप शाखा संघटक , गट संघटक व समस्थ पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात उपक्रमाचे आयोजन केले आहे.
दिवा दातीवली रोड,शिवसेना शाखा तीसाई नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे समस्त दिवावसियानी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आयोजक निलेश म्हात्रे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.



