Breaking
ब्रेकिंग

मुंबईत काही दिवसा पूर्वी लोकलच्या धडकेत भीक मागणाऱ्या इसमाचा मृत्यू,पोलिसांनी घर शोधताच घरात सापडले अबब.. इतके रुपये..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मुंबई – हार्बर मार्गावर लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या एका भिकाऱ्याच्या झोपडीत सापडलेली रक्कम पाहून डोळे चक्रावून जातील. भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये लाखो रुपयांची नाणी आणि फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल पावणे दोन लाख रुपयांची नाणी, 8 लाख 77 हजार रुपये रुपयांचे फिक्स डिपॉझिट सर्टिफिकेट तसेच बँक खात्यामध्ये 96 हजाराची रक्कम आदी मालमत्ता आढळून आली आहे.

भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये इतकी मोठी मालमत्ता पाहून पोलीस देखील चक्रावून गेले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, लोकलच्या धडकेत एका भिकाऱ्याचा मृत्यू झाला. या भिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूनंतर त्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस त्याच्या गोवंडी येथील झोपडीत गेले. त्यावेळी पोलिसांना ही मालमत्ता सापडली आहे. बिरंदीचंद पनारामजी आजाद असं या 75 वर्षीय भिकाऱ्याचं नाव आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे