Breaking
ब्रेकिंग

 दिवा शिळ रस्त्याच्या कामाचे ऑडीट करुन कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई  करा…. मनसे आमदार राजू पाटील 

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4
 दिवा स्टेशन ते दिवा शिळ हा मुंब्रा, नवी मुंबई, ठाणे शहराला जोडणारा एकमेव मार्ग आहे. सदर रस्त्याचे काम चालू असून सद्यस्थितीमध्ये कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गटारांची कामे केलेले नाहीत व बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे खोद काम करुन अधर्वट सोडले आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दिवा-शिळ रस्त्याच्या दुरावस्थेला ठाणे मनपातील या रस्त्यासाठी नियुक्त अभियंते व कंत्राटदार जबाबदार आहेत. कारण महानगरपालिकेमध्ये झालेल्या बैठकांमध्ये वारंवार रस्त्याच्या परिस्थितीची जाणीव करुन दिली होती. प्रत्यक्षात दौरा करुनही वस्तुस्थिती निदर्शनास आणली होती. परंतु कंत्राटदार काम असताना अभियंत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळेच या रस्त्याची दुरावस्था झाली असून मनपाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. आज शिळ ते दिवा स्टेशनपर्यंत संपूर्ण रस्त्यावर पाणी साचले आहे व प्रवाशांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, महिलांना, ज्येष्ठनागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे.
तरी कृपया आपण या रस्त्याची पाहणी करावी व रस्त्याचे ऑडीट करण्याचे आदेश द्यावेत तसेच रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार धरुन कंत्राटदार व महानगरपालिका अभियंत्यांवर कारवाई करावी असे स्पष्ट करत आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे