Breaking
ब्रेकिंग

दिवा स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता नवीन फलाटाच्या कामाला सुरुवात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटना यांच्या प्रयत्नांमुळे दिवेकर रेल्वे प्रवाशांना विशेषतः दिवा पश्चिमेतील नागरिकांना मिळणार दिलासा….

अमित जाधव- संपादक

0 2 0 9 7 4

दिवा ठाणे – ♦मागील काही वर्षात दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली असून *खासदार डॉ.श्रीकांत शिंदे* यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे दिवा रेल्वे स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला आहे.

दिवस स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता, गर्दीचे नियोजन करणे गरजेचं होतं, ही बाब लक्षात घेऊन दिवा स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर नवीन दुतर्फा उतरण्यासाठी फलाट व्हावं यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व दिवा रेल्वे प्रवासी संघटना यांच्या माध्यमातून रेल्वे कडे पाठपुरावा सुरू असताना नुकताच या नवीन फलाटाला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. आज या नवीन फलाटाचे काम सुरू केले असून पावसाळ्यापूर्वी नवीन फलाट हे दिवेकर रेल्वे प्रवाशांच्या सेवेस उपलब्ध होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

आता दिवा पश्चिमेला होणार वैद्यकीय कक्ष आणि शौचालय…

दिवा पश्चिमेला रेल्वे हद्दीत नवीन शौचालय उभारवं व दिवा स्थानकात अपघात ग्रस्त प्रवाशाला तातडीची मदत मिळावी यासाठी वैद्यकीय कक्ष उभारावं अशी मागणी प्रवासी संघटनेने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व रेल्वे प्रशासनाकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाली असून लवकरच नवीन वैद्यकीय कक्ष आणि शौचालयाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मागील काही वर्षात रेल्वे कडून दिवा स्थानकात अनेक सुख-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. दिवेकर रेल्वे प्रवाशांसाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या दिवा रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी असलेली अनेक काम मार्गी लागली असून इतर कामांना सुरूवात झालेली आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे दिवा स्थानकात सरकते जिने, पूर्वेला नवीन तिकीट घर, फलाट क्रमांक ५ व ६ शौचालय, सर्व फलाटांवर पाणपोई, पश्चिमेला तिकीट घरासमोर शेड, असे अनेक कामे सुरू करण्यात आली आहेत त्यामुळे दिवेकर रेल्वे प्रवाशांतर्फे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.आदेश भगत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मध्य रेल्वे प्रशासनाचे आभार  व्यक्त केले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे