पाऊल फाउंडेशन चे दिव्यात अनेक गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण देणे ही संकल्पना…..
अमित जाधव-संपादक
*पाऊल फाउंडेशन चे दिव्यात अनेक गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण देणे ही संकल्पना ………..*
*अमित जाधव-संपादक*
पाऊल फाउंडेशन चे सर्वसर्वी श्री.मुकेश कुमार सर यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरासारख्या विभागाला आपली कर्मभूमी आणि जन्मभूमी ओळखून शहरात शिक्षणाची कमतरता भासत असून अनेक गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात शैक्षणिक व गुणसंपन्न करणे अत्यंत गरजेचे आहे हीच उणीव भरून काढण्यासाठी मुकेश कुमार सरांनी दिवा शहरात ही संकल्पना पुढे करून होतकरू ,कष्टकरू व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या अनेक गोरगरीब विद्यार्थीयांना चांगल्या दर्जाचे मोफत असे उच्च शिक्षन पाऊल फाउंडेशन मार्फत मोफत चालू केल आहे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की गोरगरिबांच्या मुलांची सेवा ही पैसे देऊन नाही तर शिक्षण देऊन देखील करता येते त्यामुळे दिवा शहरात या पुढे कोणताही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यांची आर्थिक परिस्थिती कितीही वाईट असली तरीही त्यांनी वेळात वेळ काढून पाऊल फाउंडेशन कडे यावे तसेच आमच्या शी संपर्क करावा


