Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मुबंईत सर्वत्र जुगाराचे अड्डे बंद. मग सायन नायंटी फीट रोडवरच कसे सुरु…? मा. मुंबई पोलीस आयुक्त यांना सवाल..?

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

मुबंईत सर्वत्र जुगाराचे अड्डे बंद. मग सायन नायंटी फीट रोडवरच कसे सुरु…?
मा. मुंबई पोलीस आयुक्त यांना सवाल..?

मुंबई प्रतिनिधी:- सायन, मुंबई

विस्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कोव्हीड लॉकडाऊन शासनाने शिथिल केल्यानंतर काही गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांनी परत शासन आणि पोलिसांचे सर्व नियम धाब्यावर बसवून सावूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलू मुर्गन ( अण्णा )आणि पप्पू तपाल हे राजरोसपणे जगाराचे अड्डे सुरु केलेले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात पोलिसांनी थेट कारवाही करत जुगाराचे अड्डे बंद केलेले असताना पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन 90 फीट रोड, कामराज मेमोरीयल हायस्कूल जवळ आणि राधा मेडिकलच्या समोर, नेहरू चाळ, लक्ष्मी चाळ, लेबर कॅपउंड मध्ये भूमिपुत्राना आणि माध्यमावर्गी यांना देशोधडीला लावणाऱ्या या जुगाराच्या अड्डयावर सावूनगर पोलीस सायन का कचरात आहे हा सवाल सध्या मुंबईतील जनतेस पडला आहे. आणि सावूनगर पोलीस ठाणे, सायन मुंबई यांचे कामगिरीवर प्रश्न चिंन्ह उभा राहिलेले आहे.या अनुषंगाने पुन्हा मुंबई पोलीस यांचे कामगिरीवर प्रश्न चिन्ह उभा राहिले आहे.सर्वत्र मुंबईत जुगाराचे अड्डे बंद असताना सावूनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातच हे अड्डे कसे सुरु आहेत या विषयी आच्यर्य व्यक्त कारण्यात येत आहे. सायंमध्ये रात्रं दिवस बार, जुगाराचे अड्डे,बेकायदेशीर मद्य विक्री, क्रिकेट बेटिंग राजरोसपने सुरु आहे यामध्ये रोज लाखो रुपयाची उलाढाल होत असून ह्या पैस्याचा किती हिस्सा कोणाला आणि किती दिला जातो हा मुंबईतील जनतेचा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय झालेला आहे.
मुंबई पोलिसांना आकार्यक्षमतेचे आणि निशक्रियतेचे धनी करणाऱ्या या जुगाराच्या अड्डेयावर मा. पोलीस आयुक्त यांनी कायदेशीर कारवाई करून चाफ लावावा व अनेक सामान्य जनतेची कुटुंबे उद्वस्थ होण्यापासून वाचावावीत अशी मागणी सायन मधील तमाम माता भगिनी व मध्यमवर्गीय जनतेची आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे