बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ठाण्यात एमसीएचआय क्रेडाई प्रॉपर्टी चे 22 वे प्रदर्शन ७ फेब्रुवारीपासून सुरु, घर खरेदी साठी लाडक्या बहिणींसाठी विशेष सवलत..

अमित जाधव - संपादक

ठाणे ता ३० जाने २०२५ : ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ यांच्यावतीने यंदा ठाण्यातील हायलॅण्ड गार्डन मैदानावर ७ ते १० फेब्रुवारी पर्यंत ठाणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. एकाच छताखाली ठाणे शहर व जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्पात घर घेण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होईल. तर घराची २० टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या `लाडक्या बहीणीला’ विशेष सवलत दिली जाईल, अशी माहिती `क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आज दिली. या प्रदर्शनात मोफत प्रवेश व मोफत पार्किंग ठेवण्यात आली असून ठाणे पुर्व रेल्वे स्टेशनपासून मोफत बससेवा उपलब्ध असेल, असे श्री. मेहता यांनी नमूद केले.

ठाणे शहरात घरखरेदीसाठी लोकप्रिय `क्रेडाई-एमसीएचआय ‘तर्फे यंदा २२ वे प्रदर्शन भरविले जात आहे. ठाण्यातील प्रसिद्ध विकासक, आघाडीच्या वित्तसंस्था आणि गृह क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच ग्राहकांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून ‘ठाणे प्रॉपर्टी एक्स्पो’ची ओळख निर्माण झाली आहे. यंदाही या प्रदर्शनात ग्राहकांबरोबर गुंतवणूकदारांनाही नाविन्यपूर्ण व उत्तम घरे खरेदी करण्याची संधी मिळेल. तसेच कार्यालयांसाठी जागांचे पर्याय पाहता येतील.

ठाणे येथील प्रॉपर्टी प्रदर्शनात एका इमारतीबरोबरच प्रशस्त गृहसंकूले आणि परवडणाऱ्या घरांपासून उत्तम जीवनशैलीतील आलिशान घरे, व्हिला, कार्यालयीन जागा, दुकाने आदींचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध असेल. अनेक गृहसंकूलांमध्ये छोटे वन बीएचकेही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्याला अपेक्षित किंमतीनुसार घरांची निवड करता येतील. या प्रदर्शनात ठाणे महापालिका, एमएमआरडीए यांच्यासह विविध सरकारी प्राधिकरणांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. ठाण्याच्या व एमएमआर क्षेत्राच्या विकासाबाबतच्या नव्या योजनांची माहिती प्रदर्शनामध्ये मिळू शकेल. तसेच त्याबाबत सामान्य नागरिकांना आपल्या सूचना मांडता येतील. घरांच्या खरेदीत ग्राहकांना विशेष सवलती व तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे