बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ठाण्यात खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार तरुणाला गमवावा आपला जीव…..

अमित जाधव-संपादक

ठाण्यात खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार तरुणाला गमवावा आपला जीव.

ठाणे, (ता 22, संतोष पडवळ) : ठाण्यामध्ये खड्ड्यांमुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घोडबंदर रोडने ठाण्याच्या दिशेने जाताना गायमुख जकात नाक्याजवळील खड्ड्यामुळे बाईकवरून पडून मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले (२३) हा बाईकस्वार गंभीररीत्या जखमी झाला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. मोहम्मद मुंब्र्यातील रहिवासी होता. अशाप्रकारे ठाणे शहरातील खड्ड्याचा तो पहिला बळी ठरला आहे. या घटनेनंतर ती ठाणे शहरातील खड्डे बुजतील का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

मुंब्रा अमृतनगर येथे राहणारा दुचाकीस्वार मोहम्मद हा रशीद शेख यांच्या मालकीची दुचाकी घेऊन गायमुख जकात नाका येथून ठाण्याच्या दिशेने येत होता. जकात नाक्या जवळ आल्यावर तेथे पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडून त्याच्या अपघात झाला. त्यामध्ये मोहम्मद याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

तातडीने त्याला कासारवडवली पोलिसांनी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मोहम्मद याला मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे