0
2
0
9
7
4
*⭕️अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला भीषण अपघात..*
लोणावळा, ता 5 फेब्रु : अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ या ठिकणी ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गाडीच प्रचंड नुकसान झालं असून नशीब बलवत्तर म्हणून जीव मात्र वाचला असल्याची माहिती अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट लिहित दिली आहे.
“आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचला आहे. देवाच्या आशिर्वादाने आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…” अशा आशयाचे कॅप्शन लिहित किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
0
2
0
9
7
4


