दिवा भाजप आयोजित अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त दिवा स्टेशन परिसरातील महाआरती ला हजारो नागरिक उपस्थित…
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता १९ जानेवारी : अयोध्या येथील श्री राममंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त भारतीय जनता पार्टी दिवा शहर आयोजित दिवा रेल्वे स्थानक जवळील तलाव येथे भव्य महाआरती हजारो दिवेकरांच्या उपस्थितीत पार पडली.
प्रसंगी दिवा भाजपचे दिवा-शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर….. यांनी दिवा स्टेशन जवळील तलावाजवळ प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे मनोभावे पूजन केले यावेळी फुलांची उधळण करीत जय श्रीरामच्या घोषणांनी दिव्यातील स्टेशन परिसर दणाणून गेला. प्रसंगी भाजपचे ठाणे पदाधिकारी विजय भोईर, विनोद भगत, अशोक पाटील, रेश्मा पवार, रोशन भगत, दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, महिला अध्यक्षा सपना भगत, सतीश केळशीकर, दिलीप भोईर, कमलाकर पाटील, मधुकर पाटील, सीमा भगत, गौरीशंकर पटवा, जिलाजीत तिवारी, नितीन कोरगावकर, रवी मुन्नार, विठ्ठल गावडे, प्रवीण पाटील, अजित सानप, प्रफुल्ल साळवी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



