Breaking
देश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

शिळफाटा रस्त्यावरील निळजेत रिक्षा चालकाला गुंगीचे देऊन औषध देऊन लुटला सोन्याचा ऐवज…

अमित जाधव - संपादक

0 2 5 9 9 3
आम्हाला शिळफाटा रस्त्यावरील निळजे
लोढा हेवन येथे जायचे आहे, असे सांगून दोन भामट्यांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ एका रिक्षा चालकाला जबरदस्तीने येण्यास भाग पाडले. आपण नोकरदार आहोत, रिक्षा चालक नाही. तरीही आपण तुम्हाला २०० रूपये भाडे देतो सांगून दोन भामट्यांनी रिक्षा चालकाला निळजे येथे नेले. तेथे त्यांना शीत पेयातून गुंगीचे औषध पाजून त्यांच्या जवळील सोन्याचा ऐवज लुटला.
आपल्या कामासाठी डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय येथे गेलेले सदस्य घरी येत नाही. त्यांचा कुठे ठावठिकाणा नाही. म्हणून कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार केली. त्यानंतर दोन दिवसांनी रात्री हे रिक्षा चालक बेशुध्दावस्थेत काटई नाका भागात आढळले. शुध्दीत आल्यावर आपल्या गळ्यातील सोन्याचा ऐवज, हातामधील सोन्याची अंगठी चोरीला गेल्याचे रिक्षा चालकाच्या निदर्शनास आले.
मिळालेली माहिती अशी, गुलाब माने हे नोकरदार आहेत. ते कुटुंबीयांसह कल्याण पूर्वेतील अडवली ढोकळी भागात राहतात. गेल्या आठवड्यात त्यांचे डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात काम होते. त्यांनी आपला भाऊ संतोष माने यांची रिक्षा घेऊन रुग्णालय गाठले. दुपारच्या वेळेत परत घरी येत असताना डोंबिवली पूर्वेतील पी. पी. चेंबर्स मॉल समोर दोन इसमांनी गुलाब यांना अडवून आम्हाला निळजे लोढा हेवन येथे जायचे आहे असे सांगितले. मी रिक्षा चालक नाही मी माझ्या भावाची रिक्षा घेऊन येथे आलो आहे, असे सांगुनही दोनशे रुपये भाडे जबरदस्तीने देऊन दोन इसमांनी गुलाब यांना निळजे लोढा हेवन शिवाजी चौक भागात नेले.
1/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 9 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे