जोगेश्वरी प्रतापनगर गणेशोत्सव सामाजिक उपक्रम सुरू….
जोगेश्वरी प्रतापनगर गणेशोत्सव सामाजिक उपक्रम सुरू
जोगेश्वरी पूर्व येथील प्रतापनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाही सामाजिक जाणिव ठेऊन गणेशोत्सव साजरा होत आहे.मागील दोन वर्षपासून मंडळाच्या माध्यमातून गणपती उत्सवाच्या दहा दिवसांत गणेशभक्तांना आवाहन करण्यात येते की गणरायाच्या चरणी हार फुल फळं, नारळ पेढे लाडु न वाहता त्याऐवजी शैक्षणिक साहित्य म्हणजे वह्या पेन पेन्सिल कंपास पेटी,तसेच जीवनावश्यक वस्तू डाळ तांदूळ,गहू,पीठ,साखर,तेल,रवा इत्यादी अर्पण करावं..हा उपक्रम राबविण्याचे हे दुसर वर्षं असून पहिल्या वर्षी जमा झालेलं सर्व साहित्य विरार येथील साई आधार आश्रमात शिकत असलेल्या विधार्थीना सुपूर्द करण्यात आले.यंदाही दहा दिवसांत जमा होणारे हे साहित्य अशाच गरजू शाळेत देण्यात येणार असल्याचे जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे सल्लागार गणेश हिरवे यांनी सांगितले.विशेष म्हणजे हे सर्व साहित्य जमा किंवा आपापल्या परीने गणपतीच्या चरणी अर्पण करण्यासाठी मंडळातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मंडळाच्या महिला वर्ग आणि स्थनिक नागरिक पुढाकार घेताना दिसतात.नुकताच महाड येथिल पूरग्रस्तांना मंडळाच्या वतीने मदत पोहचविण्यात आली. दरवर्षी आरोग्य शिबीर,रक्तदान शिबिर,यांसारखे सामजिक उपक्रम तसेच रुग्णांसाठी मोफत आरोग्य सामान वापरा व परत करा या नियमाने दिलं जात.जास्तीत जास्त गणेशभक्तांनी याकामी पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन मंडळाने केलं आहे.
गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व



