आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
⭕️महावितरणच्या महिला अतिरिक्त कार्यकारी अभियंतेस 50 हजारांची लाच घेताना ACB कडून अटक….
अमित जाधव-संपादक
*⭕️महावितरणच्या महिला अतिरिक्त कार्यकारी अभियंतेस 50 हजारांची लाच घेताना ACB कडून अटक.*
नवी मुंबई, ता 31 मार्च ( संतोष पडवळ) : नवी मुंबईतील महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या ऐरोली सेक्टर १५ उपविभागीय कार्यालयाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्षा देशमुख यांना रुपये 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
विद्युत ठेकेदार धर्मराज देशपांडे यांनी एका ग्राहकाचे विजेचा लोड वाढवण्याचे काम घेतलेले होते त्या कामाकरिता त्यांच्याकडे कामास असलेल्या मुलीकडे लाचेची मागणी केलेली होती व त्या मागणीच्या अनुषंगाने पैसे देत असताना त्यांना अँटी करप्शन ठाणे ब्युरो येथे कार्यरत असलेल्या डीवायएसपी माया मोरे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी यांनी यशस्वीरित्या सापळा रचून पकडले.