Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषिवार्ता

दिव्यातील आगासन गणेश मंदिरातील दानपेटी फोडणारा चोर अखेर अटकेत..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता ११ ऑक्टो : दिवा शहरातील आगासन येथे ०३/१०/२०२५ रोजी पहाटे ५ ते ५:३० वाजेचे दरम्यान गणेश मंदिर आगासन रेल्वे फाटक दिवा पूर्व ता. जि. ठाणे येथील गणेश मंदिराच्या सभा मंडपातील स्लायडींगची खिडकी उघडुन खिडकीतुन आत प्रवेश करून मंदिराच्या गाभा-यातील गणेश मुर्तीच्या समोर ठेवलेल्या दानपेटी व त्यातील रोख रक्कम फिर्यादी देवेंद्र पाटील (वय 33) यांच्या संमतिशिवाय चोरून नेली म्हणुन मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रसंगी दिवा पोलिसांना तात्काळ सूत्र हलवत परिसरातील सिसिटीव्हीच्या माध्यमातून मोठ्या तांत्रिक कौशल्याने आरोपीस अटक करण्यात यश आले आहे. आरोपीला मोठ्या शिताफिने अटक करत तुरुंगात टाकले आहे. सदर आरोपीचे नावं सिद्धांत तांबोळी (वय ३१, राहणार दिवा ) असून अटकेच्या वेळेस आरोपिच्या अंगझडंतीत काही मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा पोलिसांनी केली असून मा. न्यायालयाने त्यास ऐक दिवसीय कस्टडी मंजूर केली असून पुढील तपास सुरु आहे. सदरच्या यशस्वी कारवाईमुळे आगासन ग्रामस्थ्य व दिवा वासीयांनी देखील दिवा पोलिसांचे कौतुक केले आहे.

3.2/5 - (6 votes)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे