दिवा रोटरी क्लब व पाटीलबाबा प्रतिष्ठान आयोजित १० ऑगष्टला भव्य रोजगार मेळावा….
अमित जाधव - संपादक
ठाणे ता ७ ऑगस्ट : रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे व पाटीलबाबा प्रतिष्ठान आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचे रविवारी 10 ऑगष्ट 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. दिवा शहरातील गणेश विद्यामंदिर, गणेशपाडा येथील शाळेत रोजगार मेळावा होणार असून इयत्ता 10 वी, 12 वी व पदवीधारकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या रोजगार मेळाव्यात फ्लिपकार्ट, अमेझॉन, यशस्वी ग्रुप, युवा लक्ष सारख्या अनेक कंपन्या सहभाग घेणार आहेत या सुवर्णसंधीचा दिव्यातील तरुण तरुणींनी लाभ घेण्याचे आयोजकांनी आवाहन केले असून रोजगार मेळाव्यात अनेक बेरोजगार युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्यांवर आधारित नोकऱ्यांसाठी संधी उपलब्ध होणार आहे. या मेळाव्यात, निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात येतील असे आयोजक यांनी बोलताना स्पष्ट केले. रोटरी ऑफ दिवा, ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, प्रोजेक्त हेड नवनीत पाटील, युवराज बेडेकर, सचिव स्वप्नील गायकर यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.



