सर्वसामान्यांसाठी व्हँलिअंट फेम आयकाँन आँफ महाराष्ट्र 2022 फँशन शो लवकरच मुंबईत , 5 ते 75 वर्षाखालील नागरिकांसाठी भव्य फॅशन शो ही एक पर्वणीच…
अमित जाधव-संपादक
सर्वसामान्य नागरिकांसाठी फेम आयकाँन आँफ महाराष्ट्र 2022 फँशन शो लवकरच मुंबईत
5 ते 75 वर्षाखालील नागरिकांनसाठी भव्य फॅशन शो ही एक पर्वणीच
मुंबई (प्रतिनिधी) जागतिक दर्जाच्या किंवा राष्ट्रीय स्तरावर कधीही आपल्याजवळील असलेल्या कला सादर करता न आलेल्या लोकांसाठी व्हँलिअंट फेम आयकाँन आँफ महाराष्ट्र 2022 मुंबईत प्रथमच फँशन शो स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यामध्ये कधीही संधी न मिळालेल्या 5 वर्षे ते 75 वर्षे वयोगटापर्यंतच्या नागरिकांना सहभागी होता येणार आहे.या कार्यक्रमामुळे अनेक नागरिकांना आपल्या अंगभुत कलेला वाव मिळणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री सूरज भोईर आणि अंजली साखरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विविध जागतिक,राष्ट्रीय,राज्यस्तरीय फँशन शो स्पर्धा भरविल्या जातात.मात्र अश्या स्पर्धांमध्ये सामान्य नागरिकांना आपल्यात उपजत कला असूनही संधी मिळत नाही.म्हणून पहावे एकदा करुन या संकल्पनेवर आधारीत ज्यांना स्पर्धेचा लाभ घेता आलेला नाही अश्या सामाजातिल वंचित नागरिकांना हे स्पर्धेचे व्यासपीठ मिळणार आहे.या स्पर्धेची माहीती फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पहावे एकदा करुन या पेजवर देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सर्व क्षेत्रातील नागरिक,ट्रान्स जेन्डर,अनाथ मुले मुली,यांना सहभागी होता येणार आहे.येत्या आँक्टोबर महिन्यात ही स्पर्धा होणार असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी होणार आहेत.


