दिवा शहर मनसे चा दणका,अखेर अनधिकृत फेरीवाल्यांवर ठाणे महपालिकेची मोठी कारवाई….
अमित जाधव -संपादक
दिव्यातील अखेर अनधिकृत फेरीवाल्यांवर दिवा मनसे आंदोलनाच्या इशाऱ्या ने ठाणे महापालिकेची मोठी कारवाई…..
दिवा स्टेशन परिसरात रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. या फेरीवाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा यांनी पालिकेला फेरीवाले हटाव मोहिमेअंतर्गत पालिकेला आंदोलनाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालिकेने फेरीवाल्यांच्या हातगाड्या रस्त्यावरच जेसीबीच्या साहाय्याने तोडक कारवाई करून सदर रस्ता मोकळा केला आहे
दिव्यातील स्टेशन जवळील रस्त्यावर नागरिकांना या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे चालण्यास देखील मोठ्याप्रमाणावर त्रास होत होता दिवा स्टेशन रोड तसेच दिवा आगासन रोड येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर फेरीवाल्यानी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली होती.
फेरीवाले हे हातगाड्या व टपऱ्या लावून धंदा करत आहेत. भाजीपाला, फळे व कपडे आणि इतर वस्तू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात असून हा रस्ता फेरीवाल्याना आंदण दिला आहे का असा प्रश्न मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे उपस्थित केला होता. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माणसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, दिव्यातील नागरिक हे फेरीवाल्याकडे भाजीपाला, फळे घेण्यासाठी गर्दी करत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता त्यामुळे दिव्यातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. फेरीवाल्याबरोबर राजकीय व पालिकेच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे त्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच फेरीवाले हे बिनधास्तपणे रस्त्यावर बसून अतिक्रमण करत आहेत.
फेरीवाल्यावर कारवाई केली जाते परंतु दोन चार दिवसानंतर आहे तीच परिस्थिती निर्माण होते व पुन्हा कारवाई केली जात नाही. बुधवारी पालिकेकडून फेरीवाल्याच्या हातगाड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना दिवा प्रभाग समितीचे अतिरिक्त आयुक्त फारुख शेख यांच्या आदेशानुसार प्रभागाचे प्रभाग अधिकारी, पोलीस बंदोबस्तात जवळपास हातगाड्या जागेवरच तसेच टपऱ्या तोडून कारवाई करण्यात आली या मुळे दिवावासीयांच्या दिवा मनसे चे आभार व्यक्त करत अभिनंदन केले