बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

टायटन मेडिसिटी (कासारवडवली) आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा , प्रिंट मीडिया कार्यक्षम आणि बळकट होणे काळाची गरज आहे ..डॉ.विश्वासराव आरोटे

अमित जाधव - संपादक

टायटन मेडिसिटी (कासारवडवली) आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

प्रिंट मीडिया कार्यक्षम आणि बळकट होणे काळाची गरज आहे ..डॉ.विश्वासराव आरोटे

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व टायटन मेडिसिटी यांच्याकडून देण्यात आलेले वैद्यकीय योजना कार्ड चे वाटप

ठाणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री.वसंत मुंढे, राज्य संघटक श्री.संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस श्री.विश्वासराव आरोटे, प्रसिध्दी प्रमुख श्री.नवनाथ जाधव, कोकण विभागीय अध्यक्ष श्री. नितिन मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनात ठाणे शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालय मुबंई येथे*आपला अप्रतिम मीडिया* च्या वतीने *”चौथास्तंभ विकास पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार”* देऊन गौरविण्यात आले.

मराठी पत्रकारितेचे जनक (दर्पणकार) बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त दि.६ जानेवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजन केले होते. या महाआरोग्य शिबिरास डॉ. विश्वासराव आरोटे (सरचिटणीस) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, श्री मंगेश विश्वासराव- वरिष्ठ पत्रकार, श्री जतीन राय- (संचालक) राममूर्ती एज्युकेशन सोसायटी, श्री प्रमोद इंगळे(प्रमुख सल्लागार)म. रा. म.प.सं, श्री नितीन शिंदे (कोकण विभाग अध्यक्ष) म. रा. म. प. सं, प्रभाकर जाधव (ज्येष्ठ पत्रकार),सुरेश पाटीलखेडे ओबीसी नेते,डॉ.राजश्री जाधव मेडिकल डायरेक्टर टायटन मेडिसिटी कासारवडवली,डॉ. अश्विनी मुळे पाटील मनोरुग्नतज्ञ,श्री मनोज गुप्ता मार्केटिंग हेड टायटन हॉस्पिटल यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती लाभली.

यावेळी सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार, टायटन मेडिसिटी डायरेक्टर डॉ.राजश्री जाधव आणि मनोतज्ञ डॉ. अश्विनी मुळे पाटील यांनी नागरिक आणि समस्त पत्रकार बंधू-भगिनी यांना वैद्यकिय मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी ठाणे शहरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांना पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारीना नियुक्तीपत्र *”टायटेन मेडिसीटी तर्फे”वैद्यकिय योजना कार्ड”* चे वाटप करण्यात आले

महाआरोग्य तपासणी शिबीरास नागरिक व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल अध्यक्षांनी आभार व्यक्त केले आहेत.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, मुख्य सल्लागार प्रमोद इंगळे , कोकण विभगीय प्रसिद्धी प्रमुखविलास शंभरकर,उपाध्यक्ष सुबोध कांबळे, मिनल पव‍ार, सचिव अतुल तिवारी, कार्याध्यक्ष मिलिंद दाभोळकर, प्रमुख सल्लागार सतिशकुमार भावे, सल्लागार संजय तांमडे, सह सचिव संतोष पडवळ, अश्विन कांबळे, वृत्तवाहिनी प्रमुख अमित जाधव, वृत्तपत्र प्रमुख राजन पाटील, छायाचित्र प्रमुख सुभाष जैन, समाजमध्यम प्रमुख प्रशांत मोटे, प्रसिध्दी प्रमुख अमित गुजर, देवेंद्र शिंदे, कार्यकारी सदस्य भानुदास शिंदे, अभिजीत चव्हाण, गफुर धारवार, मनस्वी चौधरी, मंजुषा निकम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे