Breaking
ब्रेकिंग

नालासोपाऱ्यामधील तुळींज पोलीस ठाण्यातच एका तरुणाने पोलिसाला मारहाण…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

नालासोपाऱ्यामधील तुळींज पोलीस ठाण्यातच एका तरुणाने पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत पोलिसाचा दात तुटला आहे. तुळींज पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण रानडे (३३) हे पोलीस शिपाई वसई वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास ते नालासोपारा पूर्वेच्या उड्डणापूलाजवळ कर्तव्यावर होते. त्यावेळी शैलैश वाघेला (३६) याने रिक्षातून रानडे यांचे मोबाईल मधून चित्रिकरण करण्यास सुरवात केली. त्याला रानडे यांनी आक्षेप घेत कारण विचारले. मात्र वाघेला याने रानडे यांनी दमदाटी केली करत शिविगाळ केली. त्यामुळे वाघेला याला शांततेची समज देण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्यात आणले व सर्व हकीगत सांगते वेळेस आरोपीने त्यांना ठोसा मारला व खाली पाडले इतर पोलिसांनी त्वरित आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे