Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील अनेक महिलांना मेट्रोमोनियल या ऑनलाइन साईट वरून लग्नाचे अमिश दाखवत जवळ जवळ एक कोटींची फसवणूक…….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

♦महाराष्ट्रातील अनेक महिलांना मेट्रोमोनियल या ऑनलाइन साईट वरून लग्नाचे अमिश दाखत जवळ जवळ एक कोटींची फसवणूक…….

ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी…..

मेट्रोमोनियल साईट वरून महिलांना खोटे आश्वासन देऊन स्वतःची बनावट प्रोफाइल तयार करून शास्त्रज्ञ किंवा स्वतःला उच्चपदस्थ अधिकारी भासवून अनेक महिलांना लग्नाचे अमिश देत फसवणूक केली या महाठगास ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने अखेर जेरबंद केले.
कल्याण येथे एका महिलेने आपला परिचय जीवनसाथी डॉट कॉम या लग्न जुळवणाऱ्या ऑनलाइन संस्थेत टाकला होता व योग्य जोडीदाराच्या शोधात असताना महिलेने मेट्रोमोनियंल साईट वर सदर इसमाच परिचय उच्च पदस्थ्य अधिकारी असल्याचे कळले असता महिला सादर आरोपीच्या जाळ्यात अडकली व लग्न करण्याचा अश्वासनाने वेगवेगळी कारणे सांगून या भूलथापाना बळी पडून अनेक बँकेतून 14 लाख 36 हजार रुपये वेगवेगळ्या खात्यामधून फसवणूक करणाऱ्या आरोपीस दिले व पुढे 25 लाखाची मागणी केल्याने महिलेस या बाबत संशय आला व त्वरित खडकपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
जीवनसाथी डॉट कॉम,शादी डॉट कॉम आशा अनेक संस्थेच्या ऑनलाइन प्रोफाइल वरून आरोपी वेगवेगळी नावे बदलून अनेक महिलांची जवळ जवळ 1 कोटी रुपयांची फसवणूक करत गडा घातला आहे अशा घटना निदर्शनास आल्यास अखेर मा.पोलीस आयुक्त श्री.जयजीत सिह साहेब यांनी तपासाचे आदेश दिले असता त्या वरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.अनिल होणराव(मालमत्ता गुन्हे शाखा)यांनी शोध घेण्यास सुरुवात केली व सादर तांत्रिक माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपी आणखी एका मुलीस लग्नाचे अमिश दाखवून वाशी येथे भेटणार असल्याचे कळताच आरोपीला ताब्यात घेतले त्याच्या कडे कसून चौकशी केली असता आरोपी हा विवाहित असून त्यास एक मुलगा देखील आहे व तो नासा,शात्रज्ञ किंवा इस्रो सारख्या मोठ्या आंतराष्ट्रीय संस्थे मध्ये उच्च पदावर नोकरीस असल्याचे भासवून त्याने आता प्रयन्त महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेरील तब्बल 14 महिलां व मुलींची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे अजून देखील महिला तक्रारी देण्यासाठी पुढे येत आहे सादर आरोपी विरुद्ध मुंबई ,नवी मुंबई आणि पुणे येथे एकूण ७ गुन्हे दाखल असून पुढील तपास चालू आहे.
सादर कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त मा.जयजीत सिह ,मा.सह पोलीस आयुक्त सुरेश कुमार मेखला,सो.अप्पर पोलीस आयुक्त मा.अशोक मोराळे(गुन्हे),पोलीस उपायुक्त मा.लक्ष्मीकांत पतील सा(गुन्हे),सह पोलीस आयुक्त श्री.अशोक राजपूत(शोध-२ गुन्हे शाखा),यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अनिल होणराव,पो.उ-दिनेश शेलार,पोलीस उ.नि.महेश जाधव,पो.ह.वा.जयकर जाधव,अर्जुन करळे, नितीन ओवलेकर,रुपवंत शिंदे,नागराज रोकडे,किशोर भामरे,अजित शिंदे,बाळा ठाकरे,आणि महिला पोलीस अंमलदार आशा गोळे यांनी केली.

*ठाणे पोलीस विभागामार्फत आव्हाहन*

@आदित्य@नव्ह्यूश@तन्मय प्रशांत म्हात्रे या नावाने महिला किंवा मुलींची फसवणूक झाली असल्यास त्वरित कळवावे

मेट्रोमोनियंल साईट वरून लग्न जमवताना आपण चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात जाणार नाही अथवा प्रलोभनांना बळी न पडता फसवणूक होणार नाही याबाबत अवश्य काळजी घेण्यात यावी

ऑनलाइन असणाऱ्या जीवनसाथी,शादी डॉट कॉम इत्तर अनेक लग्न जमविण्याच्या वेबसाइट वापरताना योग्य ती काळजी घ्यावी

ठगेबाज इसमाशी ओळख झाल्यास पैशाची किंवा अनैतिक मागणी केल्यास त्यापासून वेळीच सावध होऊन त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करावा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे