दिव्यात सिमेंट मिक्सर ट्रक च्या खाली आल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू…
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता १९ नोव्हें : दिव्यात सिमेंट मिक्सर ट्रकखाली आल्याने पादचाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिवा शिळफाटा रोडवर दिवा मोहत्सव मैदानाजवळील तिरुपती हार्डवेअर दुकानासमोर रस्त्याने चालत असलेले गणेश परब रा. रूम नं ०५, चाळ नं ०१, गणेश सदन चाळ, प्रेरणा टॉवरच्या समोर दिवा पूर्व यांना सिमेंट मिक्सर ट्रक (MH 05 DK 2100) निष्काळजीपणे चालकाने ट्रक चालवल्यामुळे गाडीखाली आल्याने गंभीर जखमी झाला होता प्रसंगी वेळेवर कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला होता. प्रसंगी जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी परब यांस मृत घोषित केले फिर्यादी मुलीच्या तक्रारी वरून घटनेचे गांभीर्य ओळखून मुंब्रा पोलिसांनी तांत्रिक बाबीने शोध घेत सिमेंट मिक्सर सहित आरोपी चालकाला अटक केली आहे.
मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल सोनावणे व तपास अधिकारी राजेंद्र तोरडमल यांनी दखल घेत आरोपीला गुन्हा क्र. १८४२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१ सह मो. वा. का. कलम १३४ (अ) (ब),१८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व आहे पुढील तपास सुरु आहे



