दिव्यातील समाजसेवक अशोक सोलंकी यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत अंकुर सामाजिक संस्था संचालित अंकुर बाल विकास केंद्र, हेदुटने (डोंबिवली)अनाथ आश्रम मध्ये मुलांसोबत धुळवड साजरी करत एक सामाजिक पायंडा पाडला तसेच अनाथालयात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत मुलांना धुळवडीच्या रंगात खेळवत आनंद साजरा केला.
सोलंकी कुटुंब नेहमी समाजसेवेत पुढाकार घेत असून वेळोवेळी अनाथालयांसाठी शक्य होईल तेवढे सहकार्य करत आहेत .ह्या वेळी होळी सणाच्या औचित्य साधून अशोक सोलंकी यांनी मित्रमंडळी ला घेऊन अनाथालयाबाबतीत सहकार्य करण्याचे ठरविले व सर्व मित्र मंडळीने 20/25 मुलांना कमीत कमी दोन महिने पुरेल तेवढे किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य केलं.
अशोक सोलंकी यांनी मनापासून सर्वांच आभार व्यक्त करत यापुढेही असेच समाजकार्य घडवत आपल मत व्यक्त केलं.