बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन…

अमित जाधव-संपादक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले . सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयातच हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर सिंधुताई यांना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली आहे.

त्यांना गेल्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्याआधी 2010 साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशाप्रकारे सिंधुताई यांना जवळपास 750 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सिंधूताई यांचं समाजकार्याची जगभरात दखल घेतली गेलीय. त्यांनी आपल्या आयुष्यात खूप खडतर प्रवास केला.

मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. . वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झाले होते. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवले.लहान मुलांच्या शिक्षणापासून ते उज्ज्वल भविष्याची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यादिशेने त्यांनी अनेक वर्ष काम केले होते .

अनाथांची माय.. स्व सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे