Breaking
ब्रेकिंग

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे चार मजली इमारत कोसळली,22 रहिवाशी अडकल्याची शक्यता…..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

आज दिनांक २९/०४/२०२३ रोजी १३:०० वाजताच्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार वर्धमान कंपाऊंड, वाल व्हिलेज, दापोडा मार्ग, भिवंडी ग्रामीण, भिवंडी. या ठिकाणी मे. एम.आर.के. फुड्स (तळ+०३ मजली इमारत, अंदाजे १० वर्षे जुनी इमारत) ही इमारत कोसळली आहे. सदर घटनास्थळी इमारतीमध्ये अंदाजे २२-रहिवाशी अडकले असल्याची शक्यता आहे.

सदर घटनास्थळी प्रांत अधिकारी, तहसिलदार-भिवंडी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-ठाणे महानगरपालिका,ग्रामसेवक-भिवंडी ग्रामीण,पोलीस उपायुक्त परिमंडळ-०२, भिवंडी पोलीस कर्मचारी, दंगल गृहस्थ पोलीस, शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडीचे कर्मचारी-१०
रुग्णवाहिका, भिवंडी अग्निशमन दलाचे जवान-०१ इमर्जन्सी टेंडर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) अधिकारी कर्मचारी ०१-आयशर टेम्पोसह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे (TDRF) जवान-०१ बस वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्ष कर्मचारी ठाणे महानगरपालिक, ठाणे). उपस्थित आहेत.
सदर घटनास्थळी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने सदर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकूण-09 रहिवाशांची सुटका करण्यात आली असून, त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय भिवंडी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे