दिवा म्हात्रे गेट मधील ठाकरेंची शिवसेना नागरिकांसाठी तत्पर, प्रमुख पदाधिकारी नागेश पवार यांच्या पाठपुराव्याला यश…
अमित जाधव - संपादक
ठाणे/दिवा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे व म्हात्रे गेट मधील स्थानिक रहिवाशी तसेच ऍक्टिव्हिस्ट नागेश पवार, योगेश निकम,प्रफुल पाष्ठे, बॉबी पोटे व ईतर सहकारी यांच्या प्रयत्नाला यश आले व पालिका प्रशासनाने तत्काळ दखल घेत गटारावरील झाकणे त्वरित बसविले.
मागील काही महिन्यांपासून लोटस व्हीला ते जय बोलनाथ सोसायटी पर्यंतच्या गटारांवरील जवळपास १२-१३ ठिकाणची गटारांची झाकणे व काही ठिकाणी संपूर्ण फ्रेम तुटलेल्या अवस्थेत असून मॅनहोल उघडया अवस्थेत असल्याची तक्रार नागरिकांनी केली, परंतु त्या तक्रारीकडे पुर्णतः दुर्लक्ष केले जात असून कुठेच दाद मिळत नसल्याचे लक्षात येता अखेर नागरिक तक्रार घेऊन उ.बा.ठा गटाच्या कारकर्त्यांकडे गेले
नागेश पवार यांनी तात्काळ ट्वीटर च्या माध्यमातून ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तसेच ठाकरे गटाचे शहर संघटक यांनी सदर बाब अधिकाऱ्यांकडे लावून धरल्याने अखेर आज विकास म्हात्रे गेट मधील नागरिकांच्या तक्रारी प्रमाणे सर्व मोडलेल्या गटारांना दुरुस्त व झाकण नसलेल्या ठिकाणी झाकणे टाकून घेण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
स्थानिक रहिवाश्यांनी व विकास म्हात्रे गेट राहिवाश्यांनी मिळालेल्या सहकार्याबद्दल उ.बा.ठा गटाचे व पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले.