Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्याजवळील खर्डी गावात तलावात आढळला तरुणाचा मृतदेह….

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

⭕️दिव्याजवळील खर्डी गावात तलावात आढळला तरुणाचा मृतदेह…

ठाणे, ता 24 एप्रिल (संतोष पडवळ) : दिवा शहराजवळील खर्डी गावच्या तलावात तलावात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दान बहादूर (३८, रा. फडकेपारा) असे त्याचे नाव आहे.
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खर्डी गावातील फडके पाडा संकुलात असलेल्या तलावात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती रविवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास मिळाली. माहिती मिळताच शीळ-डायघर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह बचाव वाहने आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि मृतदेह बाहेर काढला. कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला.शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. प्रसंगी पोलीस पुढील सर्व बाजूंचा बारकाईने तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे