Breaking
ब्रेकिंग

दिवा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिवा महोत्सव समारोप प्रसंगी ग्वाही..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 3 2

दिवा शहराच्या विकासासाठी जे जे करावे लागेल ते ते केले जाईल, मागील काही वर्षात दिवा शहराच्या विकासासाठी राज्य शासन, खासदार, डॉ. श्रीकांत शिंदे व महापालिका यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत व काही विकास कामे सुरू आहेत. दिवा शहरातील पाणी प्रश्न निकाली लावण्यासाठी अतिरिक्त दहा एमएलडी पाणी वाढवून दिले जाणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा येथे आयोजित दिवा महोत्सव कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला.

25 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेल्या दिवा महोत्सवाचा काल समारोपाचा दिवस होता. सहा दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाला दिवा शहर व आजूबाजूच्या परिसराचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे व इतर अनेक मान्यवर नेत्यांनी भेटी भेट दिली.
दिवा महोत्सवाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शालेय स्पर्धा भजन गायन, ब्रास बँड, रांगोळी स्पर्धा, आदर्श शिक्षक,आदर्श माता, दिवा गुनीजन,दिवा गौरव, मॅरेथॉन, सांस्कृतिक डान्स, ग्राहक आणि खरेदीदारांसाठी मोठी बाजारपेठ, खवय्यांसाठी खाद्य स्टॉल या माध्यमातून दिवा शहरातील अनेक दिवावासियांना या महोत्सवात जोडण्याचं काम शिवसेना दिवा शहर परिवार व धर्मवीर मित्र मंडळाच्या माध्यमातून केलं गेल्याचे महोत्सवाचे संयोजक शिवसेना शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सांगितले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

समारोपाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिवावासियांच्या प्रेमाने मी भारावून गेलो असून दिवा शहरातून जे प्रेम मला मिळाले मिळते ते मी कधीच विसरू शकणार नाही अशी भावना व्यक्त केली. दिवा शहराला सुद्धा मेट्रो मार्गाने जोडण्यात यावे अशी मागणी रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली, यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा मुंब्रा दिवा मार्गे डोंबिवली मेट्रोचे सर्वेक्षण करण्यासाठी एम एम आर डी ए ला सूचना देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
दिवा शहरातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगत दिवा शहराच्या सर्वांगीण विकासाला आपला कायम पाठिंबा असेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दिवावासियांना जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत दिव्याचे डम्पिंग कायमचे बंद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी बंद केल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. दिवा शहरातील रस्ते झाले असून जे रस्ते व्हायचे शिल्लक आहेत तेही लवकर पूर्ण होतील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंब्रा दिवा हा चुवा ब्रिज मार्गे येणारा रस्ता, दिवा शहरासाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालय, स्वतंत्र पोलीस स्टेशन व दिवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या बाबीही लवकरच पूर्णत्वास जातील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे