बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

प्रणाली खांबे हिमाचल प्रदेश येथे झालेल्या द फेम मिस इंडिया 2022 च्या ठरल्या मानकरी,हिमाचल प्रदेश चे राज्यपाल यांच्या श्री.राजेंद्र अर्लेकर यांच्या हस्ते ‘किताब बहाल….

अमित जाधव-संपादक

महाड तालुक्यातील वारंगी येथील रहिवासी असलेल्या प्रणाली लक्ष्मन खांबे हिने टीम झेनिथ आयोजित मिस फेम इंडिया 2022 या प्रसिद्ध स्पर्धेचे विजेते पद पटकावले आहे ही स्पर्धा हिमाचल प्रदेश (सिमला) येथे भरविण्यात आली होती.या स्पर्धेचे आयोजक मिथिल कळंबे असून सदर स्पर्धेत भारतातील अनेक सौंदयवतींनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेत हिमाचल प्रदेश चे राज्याचे राज्यपाल श्री. राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्या हस्ते प्रणाली खांबे यांना सन्मानित करून द फेम मिस इंडियाचा किताब बहाल केला.प्रणाली खांबे पदवीधर असून अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रात काम करते किताब विजेती प्रणाली खांबे यास ‘दीप साडीज’ह्या प्रसिद्ध कंपनीने ब्रँड आंबेसॅन्डर म्हणून संधी दिली आहे तसेच सर्व नातलग ,मित्र मंडळी यांच्या कडून तिच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे