दिवा शहरातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता महिला पोलिसांची नियुक्ती करा..
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता ४ जुलै : वाढत्या लोकसंख्येच्या दिवा शहरात महिला पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती करणेबाबत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे निवेदन देण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले व ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा मंडळ महिला अध्यक्ष सौ. सपना रोशन भगत यांच्या वतीने ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले. दिवा शहरात 5 ते 6 लाख लोकवस्ती झाली आहे. महिलांवर होणारे अत्याचार, त्यांची होणारी छेडछाड तसेच विनयभंग अशा अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत आणि या सर्व कारणांमुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवा-आगसन रोड येथील ग्लोबल शाळेजवळ असलेल्या पोलीस चौकीत महिला पोलिस नसल्यामुळे अनेक वेळा महिला वर्गातून कोणतेही खाजगी तक्रार असेल तर अनेक अडचणींना सामना करावा लागतो त्या अनुषंगाने दिवा पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस अधिकारी नियुक्ती करण्यात यावी यासाठी आज आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
प्रसंगी ठाणे जिल्हा महिला सरचिटणीस रितू सिकॉन, ठाणे कार्यकारणी सदस्य पुनम तिवारी , मनीषा शालबेंद्रे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.



