Breaking
ब्रेकिंग

31 व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन 2025 साठी महापालिका सज्ज* 20 हजारांहून अधिक स्पर्धकांनी केली नोंदणी..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 5 6

ठाणे (09) – ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द् असलेली 31 वी ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन रविवार 10 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. यंदाही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर 21 किमी पुरूष व महिला तसेच 18 वर्षावरील 10 किमीच्या स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. सदरची स्पर्धा ‘मॅरेथॉन ठाण्याची.. उर्जा तरुणाईची’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धावपट्टूंसह सहभागी होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडणार असून स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी ठाणेकरांनी मॅरेथॉनच्या मार्गावर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

विविध 12 गटांत ही स्पर्धा होणार असून ऑनलाईन नोंदणी केलेल्या स्पर्धकांची वैद्यकीय चाचणी देखील पूर्ण झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील स्पर्धकांना टायमिंग चीपचे देखील वाटप करण्यात आले आहे. यंदाची ठाणे महानगरपालिका ही 6 वर्षांनी होत आहे, स्पर्धेच्या दिवशी वातावरणनिर्मिती व स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेकरितेच्या सरावासाठी झुंबा वर्कआऊटचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेजसमोर झुंबा वर्कआऊट होणार आहे.

विजेत्यांना एकूण 10 लाख 38 हजार 900 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली असून 21 कि.मी स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 1 लाखांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सर्वच बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी 1 कि.मी ची ‘कॉर्पोरेट रन’ ठेवण्यात आली असून या स्पर्धेत महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी परिवहनच्या बसेसची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

स्पर्धकांना सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वेळेत पोहचता यावे यासाठी रविवार दि. 10/08/2025 रोजी सकाळी 5.00 वा. बदलापूर ते ठाणे व दुपारी 1.00 वा. ठाणे ते बदलापूर अशी “विशेष लोकल सेवा” उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

21 कि.मी गटातील पुरूष व महिला ही स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होवून महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे. 10 कि.मी 18 वर्षावरील खुल्या गटातील स्पर्धा खारीगांव ते कोपरी मार्गे महापालिका भवन अशी असणार आहे. 10 कि.मी 18 वर्षाखालील मुलांसाठी असलेली स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून मिलेनियम टोयाटा येथे समाप्त होणार आहे. 10 कि.मी 15 वर्षावरील मुलींसाठी (खुला गट) असलेली स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. 15 वर्षाखालील मुले व मुली दोन गटासाठी – 5 किमी अंतराची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून ही स्पर्धा माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक येथे समाप्त होणार आहे. 12 वर्षाखालील मुले व मुली दोन गटासाठी – 3 कि.मी अंतराची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होवून मिलेनियम टोयाटा येथे समाप्त होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 5 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे