Breaking
ब्रेकिंग

दादर येथे दररोज प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेची महत्वाची सूचना, फलाट क्रमांकात होणार बद्दल…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर हे सर्वात मोठे आणि मध्यवर्ती स्थानक आहे. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा काहीसा गोंधळ उडतो. फलाटांचा हा गोंधळ पाहता मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील सध्याचे फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ ते १४ पर्यंत फलाटांचे क्रमांक निश्चित करण्यात आले असून, उद्या शनिवारी ९ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली

येत्या शनिवारपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील फलाटांना एका रांगेतील क्रमांक दिले जाणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील फलाटांचे क्रमांक हे एक ते सातपर्यंतच राहतील. मात्र, मध्य रेल्वेवरील फलांटांना ८ पासून ते १४ पर्यंत क्रमांक दिले जातील.
सध्या मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील एक क्रमांकाचा फलाट हा ९ डिसेंबरपासून आठ नंबर फलाट म्हणून ओळखला जाणार आहे. तर दोन क्रमांकाचा फलाट सध्या बंदच असून, तेथे रेल्वेचे काम सुरू आहे. तीन क्रमांकाचा फलाट हा नऊ क्रमांकाने, चार क्रमांकाचा फलाट दहा, पाच क्रमांकाचा फलाट हा ११ क्रमांकाचा फलाट, सध्याचा सहा क्रमांकाचा फलाट हा १२, सात क्रमांकाचा फलाट हा १३ आणि दादर टर्मिनसचा आठ क्रमांकाचा फलाट १४ क्रमांकाने ओळखला जाणार आहे. फलाट क्रमांकाच्या बदलामुळे केंद्रीयकृत रेल्वे सूचना प्रमाणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही बदल केले जाणार आहे. तर मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांवर पूल आणि स्थानकात असलेल्या दिशादर्शक फलकांवरील क्रमांकातही बदल केले जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या फलाटांच्या क्रमांकात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे