बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

नवीन वर्षात नौपाडा पोलिसांनी “माय-लेकरांची” घडवून आणली अनोखी भेट नौपाडा पोलिस स्टेशनचे एक कौतुकास्पद कार्य…….

अमित जाधव-संपादक

 

नवीन वर्षात नौपाडा पोलिसांनी “माय-लेकरांची” घडवून आणली अनोखी भेट नौपाडा पोलिस स्टेशनचे एक कौतुकास्पद कार्य

  1. ठाणे – नौपाडा पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी रात्री 09:30 वाजताचे सुमारास तलावपाळी येथे आईचे शोधात असलेली 3 वर्षाची जया नावाची मुलगी नौपाडा पोलिसांना मिळाली.

नौपाडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर यांनी तीला तिचा पत्ता विचारला असता ती ‘ब्रिजखाली’ एवढेच सांगत होती. तिला काहीच सांगता येत नव्हते. घाबरलेल्या आवस्थेत असलेल्या जयास सुहास हट्टेकर यांनी जवळ घेवून धिर दिला व आपले कर्तव्य बजावण्यास सुरूवात केली.

नौपाडा पोलिस स्टेशनचे रात्रपाळीचे अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर,अंमलदार तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी बिट मार्शल्स सह संपूर्ण नौपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिच्या आई वडिलांचा शोध घेतला असता रात्री साधारणतः 01.30 वाजताचे दरम्यान ठाणेनगर पोलीस स्टेशन येथे सुद्धा एक 5 वर्ष वयाचा मुलगा मिळून आल्याची बातमी मपोना/ शागलूलु यांना समजली असता त्यांनी ठाणेनगर पोलीस स्टेशन येथे वॉटसअप द्वारे व्हिडीओ कॉल केला असता सदर मुलीने ठाणे नगर येथे मिळून आलेल्या तिच्या लहान भावास ओळखल्याने सदर भाऊ बहीण यांच्या आई वडिलांचा नौपाडा पोलिसांनी कसोसिने शोध घेऊन रात्री 02.00 वाजता कळवा ब्रिजचे खाली असलेल्या त्यांचे आईचे ताब्यात दिले.

त्यामुळे नौपाडा पोलिस स्टेशनचे रात्रपाळीचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास हट्टेकर व त्यांच्या साथीदारांनी हरवलेल्या आई व मुलांची भेट घालून दिल्यामुळे नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, मुलांची आई व नागरिकांनी कौतुक करून अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे