Breaking
ब्रेकिंग

धर्मवीर आनंद दिघे याच्या स्मृतिदिना निमित्त दिवा शहर बेडेकर नगर येथे भव्य आरोग्य शिबीर संपन्न..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे, दिवा ता २७ ऑगस्ट :स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचे अवचित्य साधून शिवसेना दिवा शहर अंतर्गत शिवसेना शाखा बेडेकर नगर च्यावतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, सदर शिबिरामध्ये सर्व आजारावरील तपासण्या व चष्मे वाटप मोफत करण्यात आले. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक आहेत, त्यांनादेखील त्या मोफत केल्या जातील, ठा.म.पा धर्मवीर आनंद दिघे हृदयरोग उपचार केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा, मातोश्री गंगुबाई संभाजी हॉस्पिटल (श्री नगर वागळे इस्टेट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन शिवसेना दिवा शहर प्रमुख मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शिबिराचे आयोजन मा. नगरसेवक दिपक नामदेव जाधव यांनी केले होते. प्रसंगी सदर शिबिरास मा. नगरसेविका दर्शना म्हात्रे तर चरणदास म्हात्रे, उमेश भगत, शशिकांत पाटील, धीरज देशमुख, निखिल पाटील, गुरुनाथ पाटील, दीपक मुंडे, तुकाराम मुंडे, जगदीश भंडारी, योगेश कारंडे, राम पवार, अमर पावले, भूषण पाटील, केशव पाटील, धीरज देशमुख, सुधीर म्हात्रे, मनोज खंडागळे, राजेश खांगटे, अनिल भुवड, विश्वनाथ बेडेकर, शर्मिला म्हात्रे, अजित चव्हाण, शिवा मशाळे, शिवदास खैरे, जगदीश घाडी, संदीप गावडे, विश्वनाथ मानवे, विनोद घाग, महेंद्र वालम, हेमंत जाधव, समीर शिंदे, रोशन शिंदे, सुभाष पडये, दिनेश माळी, सचिन जाधव, विकास म्हात्रे, विशाल मुंडे, मंगेश शेलार, उमेश घोगळे, वडकर, दाजी माडगे, राजू गायकवाड, निवृत्ती पाटील, कृष्णा खंदारे, मनोज शिवणगेकर, पुंडलिक बामणे, राजू पाटील, शाखाप्रमुख सुरेश पाटील, राजेश पाटील, जुगनू म्हात्रे, महेश पाटील तर कोमल कारंडे, जानवी केदारे, अश्विनी जाधव आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे