Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

गणपती उत्सवा साठी डहाणू डेपोतून कोकणात बसेस सोडा…मोईज शेख

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*गणपती उत्सवा साठी डहाणू डेपोतून कोकणात बसेस सोडा…मोईज शेख*

आगामी गणपती उत्सवा साठी डहाणू बस डेपो तून 26 व 27 ऑगस्ट रोजी डहाणू..रत्नागिरी ही बस सेवा सुरू करावी अश्या मागणीचे निवेदन पालघर जिल्हा काँग्रेस चे वरिष्ठ उपाध्यक्ष मोईज शेख यांनी डहाणू बस डेपो व्यवस्थापकांना दिले. यावेळी त्यांच्या सोबत डहाणू चे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जावेद मुजावर देखील हजर होते.
कोकणातल्या लोकांना डहाणू येथून गावी जाण्यासाठी फार काही खास व्यवस्था नसल्याने, सणासुदीच्या काळात त्यांना हा प्रवास फार हेलपाटे घालून करावा लागतो. ही बाब लक्षात घेवून
मोईज शेख यांनी ही रास्त मागणी डहाणू बस डेपो व्यवस्थापकांना केली आहे. सुस्थितीत असणाऱ्या आरामदायक बस गाड्या या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावल्यास डहाणू, चिंचणी, बोर्डी, घोलवड, कासा व चारोटी या भागात राहणाऱ्या कोकण वासियांना या बस सेवेचा निश्चितच लाभ होईल असे मत शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. सदरच्या विषयात त्वरित लक्ष देण्याची विनंती डहाणू चेस्थानिक आमदार विनोद निकोले यांनाही करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे