Breaking
गुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंग

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ता.20 ऑक्टो-ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं वयाच्या८४ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचा पुतण्या अशोक असरानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुमुखी अभिनेते गोवर्धन असरानी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. सोमवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे असरानी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप मोठं योगदान दिलं आहे. ‘शोले’पासून ते ‘धमाल’ पर्यंत अनेक पात्रं त्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी एका उमद्या अभिनेत्याला मुकली आहे.

असरानी यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीक अनेक भूमिका साकारल्या. पाच दशकांहून अधिक काळातील आपल्या करिअरमध्ये त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान विनोदी आणि सहाय्यक अभिनेत्याचे होतं, अनेक चित्रपटांना त्यांनी आपल्या भूमिकांनी जिवंत केलं होतं.

1970 च्या दशकात ते प्रसिद्धीच्या शिखरावर होते. ‘मेरे अपने’, ‘कोशिश’, ‘बावर्ची’, ‘परिचय’, ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘छोटी सी बात’, ‘रफू चक्कर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. पण त्यांनी सर्वाधिक प्रसिद्धी शोले चित्रपटातून मिळाली. त्यांनी साकारलेला जेलर आजही लोकांच्या लक्षात आहेत. ‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है’ असं सागत कैद्यांना धाकात ठेवणारा आणि त्याचवेळी उचातत्या करत चेहऱ्यावर हास्य आणणारा जेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आपल्या कॉमिक टायमिंगने त्यांनी चित्रपटसृष्टीतील स्थान निश्चित केलं होतं.

1/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे