Breaking
ब्रेकिंग

महिलेने ने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत अनेकांना गडवले,अखेर महिला तिच्या साथीदारासह पोलिसांच्या ताब्यात…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

डोंबिवली : सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीमंत व्यक्तींशी मैत्री करत त्यांना हॉटेलला बोलवून त्यांच्याकडील किमती ऐवज लुबाडणाऱ्या महिलेस व तिच्या साथीदारास मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 16 मोबाईल, एक रिव्हॉल्वर, दोन जिवंत काडतूस, दोन घड्याळं आणि 290 ग्रॅम सोने असा मुद्देमाल जप्त केला आहे. समृद्धी खडपकर आणि विलेंडर डिकोस्टा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबईमध्ये राहणारी ही महिला श्रीमंत मुलांना लुबाडून मुंबई टू गोवा विमानाचा प्रवास करत आपल्या मित्राकडे चोरीच्या वस्तू विकण्यासाठी देत होती. (taking advantage of her beauty woman robbed man of lakhs of rupees in dombivli)

महिनाभरापूर्वी डोंबिवलीतील एका केबल व्यवसायिकाची फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेची ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. सदर महिलेने त्याला एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलवले होते. हॉटेलमध्ये गप्पा मारताना सदर महिला या व्यावसायिकाला लॉजमध्ये घेऊन गेली. तिथे व्यवसायिक बाथरूममध्ये जाताच या महिलेने त्याचे रिव्हॉल्वर, सोन्याच्या चेन ,मोबाईल घेऊन पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या व्यावसायिकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. रिव्हॉल्वर चोरीला गेल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुनील तारमळे व अविनाश वनवे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

फेसबुकवर या महिलेचा शोध घेण्यात आला तिचे नाव मिळतात तिच्या नावावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का याची शहानिशा पोलिसांनी सुरू केली. या दरम्यान पोलिसांना डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात या महिला विरोधात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. महिला मुंबई येथे राहत असल्याचे माहिती मिळताच पोलिसांनी तिचा शोध घेतला. मात्र ती तिथून गोव्याला गेल्याचे समजले. अखेर पोलिसांच्या पथकाने गोवा येथे जाऊन संबंधित महिला समृद्धी खडपकर व तिचा साथीदार विलेंडर डीकोस्टा या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

या महिलेकडे चौकशी केली असता तिने याआधी अनेक लोकांची संपर्क साधून अशाच पद्धतीने त्यांना लुबाडल्याची कबुली दिली. बदनामीच्या भीतीने काही लोकांनी तक्रार केली नव्हती. त्यामुळे तिचे मनोबल वाढले व तिने असे अनेक प्रकार केल्याचे देखील उघड झालं. समृद्धीकडून समृद्धी आणि तिच्या साथीदार विलंडर यांच्याकडून पोलिसांनी 16 मोबाईल, एक रिव्हॉल्वर, महागडे घड्याळ, सोन्याचे दागिने असा 20 लाख 81 हजारांचे दागिने जप्त केले आहेत. एसीपी सुनील कुराडे यांनी याबाबत फेसबुकवर होणाऱ्या मैत्रीला भुलून जाऊ नये, त्यांच्या आमिषाला बळी पडू नये जेणे करून फसवणूक होणार नाही असे आवाहन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे