ब्रेकिंग
भारतीय जनता पक्ष दिवा विभागाचे वतीने होणारे आंदोलनाला रिपब्लिकन (आठवले)दिवा विभागाचा पाठिंबा..
अमित जाधव - संपादक
0
2
0
9
7
4
दिवा -अनधिकृत फेरीवाले यांचे विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने ही वेळोवेळी प्रशासनाला पत्रव्यवहार केला परंतु प्रशासनाने योग्य ती कारवाई फेरीवाले यांचे विरोधात केली नाही.दिव्याला चारही बाजूंनी फेरीवाले यांनी विळखा घातला आहे यामुळे दिवेकरांचा जिव गुदमरतोय चालायला रस्ता नाही वाहतूक कोंडी या सारखे गोष्टी मुळ सामान्य दिवेकर त्रस्त झाला आहे.
१७ जुलै २०२५ रोजी प्रशासनाचे विरोधात भारतीय जनता पक्षाचे वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवा विभागाचे वतीने आम्ही पाठींबा जाहीर करतो. भारतीय जनता पक्षाची जी भुमिका आहे तीच भूमिका आमची ही आहे म्हणून या आंदोलनात रिपब्लिकन पक्ष ही उतरुन भाजप ला साथ देईल असे रिपब्लिकन पक्षाचे वतीने कळवण्यात आले
0
2
0
9
7
4



